शनिवार, २४ जून, २०१७

प्रेम की.....


दि. २३_०६_२०१७

सोड...
का छळतोस मला...
आजूनही काही बाकी आहे का...?
मला वाटलं होत की खरंच खूप प्रेम करतोय तू
माझ्यावर....
पण नाही......तुला फक्त माझ शरीर हवं आहे...
तुला फक्त तुझी तहान भागवायची आहे...
बाकी काही नाही....
आताही मी तुला सोडून जात आहे...आणि तू मला
अडवण्याचा प्रयत्न करत आहेस ...
कारण मला माहीत आहे तू मला का आडवत आहेस....
कारण तू माझ्यावरच्या प्रेमाखातर मला आडवत नाहीस तर तुझी तहान आता कुठे भागेल हे पाहत आहे..कारण आता तुला प्रेमातला आणि आकर्षणातला फरक कळत नाहीये..
पण ......
आता नाही कळणार तुला ते..की नक्की तू मला का अाडवत आहेस.....
मी गेल्यानंतर काही दिवस तू रडशील....मला दोष देत बसशील..की येवढे प्रेम करूनही मी तुला सोडून गेले..
माझ्या नावाची तू तुझ्या मित्रांमध्ये ईज्जत घालवायला ही नंतर कमी करणार नाहीस....

पण.............पण..
काही काळानंतर जेव्हा तू मला हळू हळू विसरायला लगाशिल आणि माझी आठवण आलीच तेव्हा तू तुझ्या मनाला काही प्रश्न विचारशील तेव्हा तुला तुझी उत्तरे मिळतील ...
तेव्हाच तुला वाटेल की खरंच , खर बोलत होती ती...
प्रेम नव्हतच मुळीे माझ तिच्यावर...
मला सवय लागली होती तिची...तिच्या शरीराची...ती जाताना मला खरंच कळलं नाही ...

पण....त्या वेळेसही एक लक्षात ठेव मी तुझ्या जरी संपर्का मध्ये नसले किवा तुझ्याशी बोलत नसले तरी तुला माफ केलेलं असेल.....

गुरुवार, ३० जून, २०१६

अनोळखी .... पण ओळखीचे

        दि . .२९ जुन २०१६   
       वेळ . . ०८ : ००



अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!
     खुप अनोळखी माणसं मला बोलतात , कि तु तुझ्या मनातलं लगेच कसं सांगतोस किंवा लगेच असा कसा एखादयावर विश्वास ठेवतोस ...
खरं तर हिच माणसं मला ओळखीची आणि विश्वासातली वाटतात . काहीच घेणं - देणं नसतं अशा लोकांकडून कारण ऋणानुबंध जुडलेले नसतातच ना ?
त्यामुळे समोरच्याला ते पटतंय कि नाही याचा विचार मी नाही करत .मी माझ मन मोकळ करत असतो बस .
खर तर ओळखीच्या माणसांना सांगण्यापेक्षा हे खुप बरं असतं ... कारण की होत काय की ओळखीच्या माणसांना सांगायला गेल तर आपण जे सांगीतल आहे ते समोरच्या पर्यंत पोहचले की नाही याची भीती जास्त वाटते .
          खरतर माणसाला दुसऱ्याची दुःख जाणून घेण्यात आनंद वाटतो ... का वाटतो माहीत नाही ?
पण ठिकय त्या कारणाने का होईना समोरचा आपल्याला समजुण घेतोय हे महत्त्वाचे ..


चेहरे अजनबी हो जायें
           तो कोई बात नहीं,
                       रवैये अजनबी हो
                                 तो तकलीफ देते हैं  !!


गुरुवार, १७ मार्च, २०१६

काही विचार करायला लावणारं ...

* काही विचार करायला लावणारं ....

1.  ती - काही खाणार का ?
     मी - इथ माणंसच माणंसाला खातात मग माणुस काय  खाइल ..
      असो..थोड पाणी मिळाल तर बर होईल.

2 . जिंदगीकी दुवा ना दे जालीम ...
      जिंदगी किसको रास आइ है...

3 . दुसर्याची दु:ख जाणुन घेण्यात एवढा का आनंद असतो ?

4 . जीवनात एखाद विसाव्याच ठिकाण दुदैवान जर भेटल नाही..
      तर माणुस दुसर्या ठिकाणाचा आधार घेऊण जगायला लागतो..

5 . अंतररंगाचा विचार करण्याची वाट ,बाह्यारुपावरुनच जाते..

6 . तहानलला जीव आणि तहान भागवणारा जीव यांना लांबुन पहाणारा एक जीव लागतो . पण तोही कसा पाहीजे ? त्याला तहाणेची आर्त समतली पाहीजे आणि ती भागवणाऱ्याची क्षमताही ओळखीची हवी ..

7 . शोधायला गेल्यावर तेच सापडेल जे हरवले होते . पण जे बदलले आहे . ते सापडणे जरा अवघडच ...i

8 . समाधान मानूण घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही आणि पुष्कळदा स्वतःला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवईने सुखी झालेले असतात ....

९ . वेदनेत , दुःख: त आणि प्रायश्चित्तात आनंद आहे आणि त्याच्यामुळेच आयुष्याला अर्थ आहे ...

१० . ज्या गोष्टींवर माणसाच प्रचंड प्रेम असतं , तिचाच त्याच्याकडुन नाश होतो .
  फरक फक्त एवढाच आहे की ,
कोणी प्रेम देऊन मारतं तर कोणी व्देश करूण मारतं .

११ . आयुष्य हे कठीण आहे , सगळ्यांनाच ते जगण्यासाठी लढा द्यावा लागतो .
पण आव्हानांना संधी म्हणून स्वीकारणारे काहीच लोक असतात ..

१२ . वियोगाच दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं असतं
    वाट पाहण्याच्या यातना तर जीवघेण्या असतात .

१३ . शारीरिक सोंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्त ठरतं
   प्रवासभर सोबत होते ' ती विचारांचीच ..

१४. सुखाची आणि दुःखाची कारणं शोधण्यापेक्षा समोरच दुःख आणि सुख जसच्या तसं स्वीकारण हेच आधिक चांगलं .

१५. दुःख मुके असते , हेच खरे ! ते दृष्टीतुन किंवा स्पर्शातुन सांगता येते , पण शब्दांतुन काही प्रकट करता येत नाही ...

१६ . ज्या दुःखाचे स्वरूप अजुन माझे मलाच नीट कळलेले नाही . ते दुसऱ्याला तरी कसे समजाऊन सांगायचे ...

१७ . शब्द तेच असतात , फक्त त्यांची सांगड ( रचना ) कोण कुठल्या प्रकारे घालतो यावर सारा खेळ अवलंबुन असतो .

१८ . जास्त काय लिहिणार ?
       जे राहून गेलं , ते राहणारच होतं ,
     कारण , काय करायच ? हे ठावणारा मी नव्हतो .
   आजही जे करावस वाटतं आहे , ते तरी हातून कुठं  होतय ? म्हणूनच , ' जो तुझे मंजुर, वो हमें मंजुर '
म्हणत वेचारीक पातळीवर शांत आहे ...

शेवटी ...
- क्षण- क्षणाचे सोबती ....


बुधवार, ६ मे, २०१५

--- मन ---

वार - गुरूवार
दि. -  ७ मे २०१५                                                                                        

रिकामा कोण असतो......?
कुणीच नाही.....
सगळे भरलेले असतात....
काहिंचं बाहेर सांडतं तर काहिंचं आत.....

ज्यांच बाहेर सांडत ते जगाला क्वचित दिसतही असेल...पण
पण ज्यांच आत सांडत त्यांच काय ?
ते आतल्या आतच डचमळतय .....

दगडाने आपण फुटू याची भिती नाहीये त्याला......
तर एखाद्याच्या कोमल स्पर्शाने सुद्धा आपल्याला तडा जाईल याची भिती जास्त आहे......

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

स्त्री- सौंदर्य....

वार- बुधवार
दि- २२ एप्रिल २०१५

स्त्री- सौंदर्य

एक अशी गोष्ट जी मनाला मोहून जाते....
एक अशी गोष्ट  जीच्याकडे पहाताच एक वेगळीच अनुभूती येते....
एक अशी गोष्ट जीला  फक्त पहातच रहावे .....
एक अशी गोष्ट जीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात .....
एक अशी गोष्ट जीच्यामूळे रणसंग्राम लढले गेले....
एक अशी गोष्ट जीच्यामुळे ताजमहाल बांधले गेले.....
एक अशी गोष्ट जीच्यासाठी कविता  रचल्या जातात.....
खरचं बोलावे तितके अपुरेच !!!
              तुम्ही कधी उंच डोंगरावरुन कोसळणारा धबधबा पाहीला आहे का ?
किंवा संध्याकाळच्या वेळी होणारा सुर्यास्त ?
किंवा सकाळी - सकाळी बागेत उमललेल गुलाबाच फुल ? नाहीतर प्रवास करताना एखाद्या आईच्या कडेवर असलेल तिच गोंडस बाळ ? किती सुंदर गोष्टी असतात ना या ?
मनाला किती मोहवून टाकतात .
पण खरचं आपल्या मनाला मोहवून टाकणार्या गोष्टी सुंदर असल्याच पाहीजेत का ?
आपल्या नजरेत आपल्या पाहाण्यात जर सुंदरता  असेल तर आपल्याला आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट सुंदर दिसेलच की ...आपण  फक्त त्या नजरेने त्या गोष्टी कडे पहायला हव ..
       एखादी सुंदर मुलगी शेजारुन गेली आणि तिला मागे वळुन पहाण्याचा मोह आवरता नाही आला तर नवलचं....
       निसर्गाने खरचं पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या बाबतीत हे पारडं जरा जडच ठेवलेल आहे ..
खरचं स्त्रीयांच्या सुंदरतेच वर्णन करायच म्हणजे एक अशक्यप्राय गोष्टचं आहे..
        बर्याच कवींनी, गीतकारानी ,लेखकांनी स्त्रीयांना आप -आपल्या परीने खुप सोंदर्य प्राप्त करुन दिले आहे... ..तरीपन  ते कुठेतरी उणेच भासते ..
          एखाद्या स्त्रीचा कमनीय बांधा तुम्हाला आकर्षित करु शकतो ...तर एखाद्या स्त्रीचे मृगनयनी डोळे तुम्हाला भुरळ घालु शकतात ...
एखाद्या स्त्रीचे वक्षस्थळ तुमची नजर खिळवुन ठेवु शकतात .....तर एखाद्या स्त्रीचे गुलाब की पंखुडी जैसे ओठ  तुम्हाला वेड लाऊ शकतात ....
कुणाचे लांब सडक जर्द काळे केस डोळ्याचे पारणे फेडु शकतात...कुनाच लटकचं लाजन किति आकर्षक वाटत तर कुनाचं हास्य म्हणजे न भुतो ना भविष्य !!.....कुनाचं रडन तर कोनाच रागावनही तितकच मोहक ...कुनाचा मंजुळ सुमधुर आवाज तर कुनाची हरणा सारखी मोहक चाल....खरचं बोलावे तितके कमीच नाही का...?
         छोटसं भांडण झाल्यावर समजुत काढण्याच्या उद्देशाने एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला घट्ट मीठीत घेऊन तीच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेणं ,त्यावेळी प्रेयसीच्या डोळ्यात असलेली शरम तिच्या गालावर आलेली लाली ...असच प्रियकराच्या मीठीत रहावं हे मनोमनी वाटुन सुद्धा ...त्याच्या मिठीतुन सुटण्याचा तिचा खोटा अठ्ठहास ....                                             अहाहाहाहा.......खरच एक विलक्षण अनुभुती...!
          बायको स्वयंपाक घरात काम करत असताना नवर्याने मागुन हळुच येऊन तीला मारलेली घट्ट मिठी....त्यावेळचं तिच ते लटकचं रागावन ,गालातल्या गालात लाजन ...मनात नसतानही सोड सोड असा हठ्ठहास करणं...आणि हे सर्व अनुभवता नाही आल तर तो नवरा कसला....
           निसर्गताच स्त्रीयांना सौंदर्याचा अमाप खजिना लाभला आहे..आणि या सौंदर्यापोटी पुरुषांच्या मनात प्रेम व वासना या दोन वेगवेगळ्या गोष्टीनी जन्म घेतला आहे...
     एखाद्या स्त्री  सौंदर्याकडे लोभस नजरेने पहाणे ती मिळवण्याचा अठाठ्हास करणे त्या मागे लागन ही झाली तुमची वासना ...एखाद्या स्त्री सौंदर्याकडे वासनेच्या नजरेने पहाणे म्हणजेच त्या सौंदर्याचा अपमान केल्यासारखे आहे...
            पण तेच सौंदर्य तुमच्या डोळ्यात साठवने ,मनाच्या एका गाभार्यात जपुन ठेवने ...किंवा त्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन करने ही त्या सौंदर्याला मिळालेली खरी पोचपावती ...
      सौंदर्याला सुद्धा भरपुर रुपं असतात...
कधी ते साध, सोज्वळ मनाला मोहवून टाकनार व्यक्तीमत्व असत ...तर कधी साज शृंगार
करुन आलेलं आकर्षक व्यक्तीमत्व असतं....कधी ते सांज प्रहारी साजन प्रतीक्षेत ताटकळतानाच व्यक्तीमत्व असत...तर कधी रात्रीच्या गर्द काळोखात रतक्रीडेत मग्न असलेल अनोख्या तृप्तीच व्यक्तीमत  असत.....कधी ते राग अनावर झाल्यावर तापट व्यक्तीमत असत तर कधी ते झोपेत असतानाच शांत ,निरागस व्यक्तीमत  असत......
खरच व्यक्तीमत्व तेच असतं आणि सौंदर्य ही तेच असतं पण आपण ते कोणत्या क्षणी ते कसे टिपतो याला खुप महत्व आहे ...
      खरचं कधी कधी वाटत की समुद्रा प्रमाणेच सौंदर्याला सुद्धा भरती येत असावी...कारण कधी कधी होत काय की मी तिला दररोज पहात असतो...परंतु एखाद्या दिवशी ती अशी काही दिसते जणू काही मी तीला पहील्यांदाच पहात आहे आणि जसजसे तिला आजुण पाहात जावे तसतसे तिचे सौंदर्य अजुन  खुलत जाते...अगदी डोळ्यातही साठवता येणार नाही असे....

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

___ मत: धिकार __

वार- मंगळवार
दि -  ७ एप्रिल २०१५

     खरचं एकमेकांना आपण कितपत ओळखतो हो ??
का आणि कसे ओळखतो , कि फक्त आपलेच अंदाज बांधत असतो ??
पण हे अंदाज बांधणे किंवा एखाद्याविषयी आपले मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे ?
         बर्याचदा आपण  पहील्या भेटीतच समोरच्याच्या बोलण्यातुन किंवा एकंदरीत वागण्यातुन तो कसा आहे याचे स्पष्ट मत आपल्या मनावर बिंबऊन घेतो....हे खरचं कितपत योग्य आहे ..?
       पण जर योग्य असेल तर कशावरुन ..?
काय पुरावा आहे तुमच्याकडे कि तो तसा आहे..
तुम्ही तुमच्या मनानेच त्याच्याविषयीची मतं तुमच्या मनात बनऊन घेतले आहेत...
कदाचित समोरचा तसा नसेलही किंवा असही असेल कि तुमच्या मनात त्याच्याविषयी काहीतरी वेगळ मत निर्माण व्हावे म्हणुन तो तसा वागत असेल , कदाचित त्याच आत्ताच व्यक्तीमत्व आणि नंतरच व्यक्तिमत्व वेगवेगळी असु शकतात ..काहीही असु शकतं...!
पण आपण का आपल्या मनानेच त्याचा अंदाज बांधायचा...?
       पहिल्याच भेटीत समोरच्याचा चेहरा ,त्याचा स्वभाव कधिच सांगत नाही....
        असा चेहरा पाहून  त्याच्या मनातले किंवा त्याचा स्वभाव कळायला आपल्याला आधी त्याच मन बनाव लागेल..
         अहो ! इथे आपण एका भेटीतच समोरच्याच मन जाणुन घेण्याचा प्रयत्न करतो...
पण कधी कधी वर्षानुवर्ष एकमेकांच्या सहवासात राहून सुद्दा आपण एकमेकांना नीट ओळखतोच असे नाही..
     हा आता हेच पहा ना ...हे वाचल्यावर तुमच्याच डोक्यात काय-काय प्रश्न आले असतील .... " कि आपण कोनाबद्दल काय मत केल होत किंवा आपल्याबद्दल कोणी काय मत बनऊन घेतल होत.."आणि त्याच आता काय झालं...अशा प्रकारचे..
        बर्याचदा माझ्याबरोबर पण असचं झालेल आहे...समोरचा माझ्याविषयी कधी कधी त्याच्या मनात त्याच्या मनाला पटतील अशी निरनिराळी मते निर्माण करतो....तर कधी कधी मीच समोरच्याच्या मनात माझ्या विषयी काही वेगवेगळी मते निर्माण करतो...कारण नंतर मला त्याच्या मनाचा भ्रमनिरास पाहून हायसे वाटते...
         आता काहींच्या मनात मला भेटलेली पहीली भेट आठवली असेल तर नक्कीच त्यांच्या चेहर्यावर एक आडवी चंद्रकोर नक्की  ऊमलली असेल....
असाो...
तर हे असं आपण एकमेकांचे असे अंदाज बांधत बसलो कि शेवटी भ्रमनिरास आपलाच होतो...
      का एखाद्याविषयी आपल्या मनात वेगवेगळी मत निर्माण करायची...
खरच तो असा आहे की नाही याची कोणतीही शहानिशा न करता...
हो आणि एखाद्याविषयी मत निर्माण केल्यावर ती फक्त तुमच्याकडेच ठेवा..उगाच दुसर्यावर लादने हे चुकीचेच ..
कारण मतं ही तुम्हीच निर्माण केली आहेत आणि तुमच्या मतानुसार समोरच्याने वागणे हे कितपत योग्य आहे...??
 
    असो व्यक्ती तितक्या वृत्ती आणि क्षण- क्षणाचे सोबती.....
   हे क्षणही असेच निघुन जातील...

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

माझा येडेपणा . . . .

कधी- कधी येडेपणाच किंवा
बालीशपणाच पांघरुन ओढूण घेतलेलंच बरं...
नाहीतर समोरचा आपल्यालडूण कळत- नकळत काही अपेक्षा ठेऊण बसतो..
आणि नंतर अपेक्षा भंगाचा त्रास हा जास्त त्यालाच होतो...
मि असं नाही म्हणत की, मि जबाबदारीला घाबरतो किंवा त्यापासुण लांब पळण्याचा प्रयत्न करतो...
पण ,
मला माझ्या पेक्षा,त्याच्यात वाटनारा मोठेपणा किंवा माझ्यापेक्षा त्याला जास्त समज आहे ..हे त्याच्या डोळ्यातील भाव
मला एक वेगळाच अनामीक आनंद देऊण जातात ......

( ता.क - हा आता तुमच्या मनातील काही प्रश्न बाजुला ठेवा
शेवटी...
व्यक्ति तितक्या वृत्ती आणि
क्षण- क्षणाचे सोबती....)