बुधवार, ६ मे, २०१५

--- मन ---

वार - गुरूवार
दि. -  ७ मे २०१५                                                                                        

रिकामा कोण असतो......?
कुणीच नाही.....
सगळे भरलेले असतात....
काहिंचं बाहेर सांडतं तर काहिंचं आत.....

ज्यांच बाहेर सांडत ते जगाला क्वचित दिसतही असेल...पण
पण ज्यांच आत सांडत त्यांच काय ?
ते आतल्या आतच डचमळतय .....

दगडाने आपण फुटू याची भिती नाहीये त्याला......
तर एखाद्याच्या कोमल स्पर्शाने सुद्धा आपल्याला तडा जाईल याची भिती जास्त आहे......

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

स्त्री- सौंदर्य....

वार- बुधवार
दि- २२ एप्रिल २०१५

स्त्री- सौंदर्य

एक अशी गोष्ट जी मनाला मोहून जाते....
एक अशी गोष्ट  जीच्याकडे पहाताच एक वेगळीच अनुभूती येते....
एक अशी गोष्ट जीला  फक्त पहातच रहावे .....
एक अशी गोष्ट जीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात .....
एक अशी गोष्ट जीच्यामूळे रणसंग्राम लढले गेले....
एक अशी गोष्ट जीच्यामुळे ताजमहाल बांधले गेले.....
एक अशी गोष्ट जीच्यासाठी कविता  रचल्या जातात.....
खरचं बोलावे तितके अपुरेच !!!
              तुम्ही कधी उंच डोंगरावरुन कोसळणारा धबधबा पाहीला आहे का ?
किंवा संध्याकाळच्या वेळी होणारा सुर्यास्त ?
किंवा सकाळी - सकाळी बागेत उमललेल गुलाबाच फुल ? नाहीतर प्रवास करताना एखाद्या आईच्या कडेवर असलेल तिच गोंडस बाळ ? किती सुंदर गोष्टी असतात ना या ?
मनाला किती मोहवून टाकतात .
पण खरचं आपल्या मनाला मोहवून टाकणार्या गोष्टी सुंदर असल्याच पाहीजेत का ?
आपल्या नजरेत आपल्या पाहाण्यात जर सुंदरता  असेल तर आपल्याला आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट सुंदर दिसेलच की ...आपण  फक्त त्या नजरेने त्या गोष्टी कडे पहायला हव ..
       एखादी सुंदर मुलगी शेजारुन गेली आणि तिला मागे वळुन पहाण्याचा मोह आवरता नाही आला तर नवलचं....
       निसर्गाने खरचं पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या बाबतीत हे पारडं जरा जडच ठेवलेल आहे ..
खरचं स्त्रीयांच्या सुंदरतेच वर्णन करायच म्हणजे एक अशक्यप्राय गोष्टचं आहे..
        बर्याच कवींनी, गीतकारानी ,लेखकांनी स्त्रीयांना आप -आपल्या परीने खुप सोंदर्य प्राप्त करुन दिले आहे... ..तरीपन  ते कुठेतरी उणेच भासते ..
          एखाद्या स्त्रीचा कमनीय बांधा तुम्हाला आकर्षित करु शकतो ...तर एखाद्या स्त्रीचे मृगनयनी डोळे तुम्हाला भुरळ घालु शकतात ...
एखाद्या स्त्रीचे वक्षस्थळ तुमची नजर खिळवुन ठेवु शकतात .....तर एखाद्या स्त्रीचे गुलाब की पंखुडी जैसे ओठ  तुम्हाला वेड लाऊ शकतात ....
कुणाचे लांब सडक जर्द काळे केस डोळ्याचे पारणे फेडु शकतात...कुनाच लटकचं लाजन किति आकर्षक वाटत तर कुनाचं हास्य म्हणजे न भुतो ना भविष्य !!.....कुनाचं रडन तर कोनाच रागावनही तितकच मोहक ...कुनाचा मंजुळ सुमधुर आवाज तर कुनाची हरणा सारखी मोहक चाल....खरचं बोलावे तितके कमीच नाही का...?
         छोटसं भांडण झाल्यावर समजुत काढण्याच्या उद्देशाने एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला घट्ट मीठीत घेऊन तीच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेणं ,त्यावेळी प्रेयसीच्या डोळ्यात असलेली शरम तिच्या गालावर आलेली लाली ...असच प्रियकराच्या मीठीत रहावं हे मनोमनी वाटुन सुद्धा ...त्याच्या मिठीतुन सुटण्याचा तिचा खोटा अठ्ठहास ....                                             अहाहाहाहा.......खरच एक विलक्षण अनुभुती...!
          बायको स्वयंपाक घरात काम करत असताना नवर्याने मागुन हळुच येऊन तीला मारलेली घट्ट मिठी....त्यावेळचं तिच ते लटकचं रागावन ,गालातल्या गालात लाजन ...मनात नसतानही सोड सोड असा हठ्ठहास करणं...आणि हे सर्व अनुभवता नाही आल तर तो नवरा कसला....
           निसर्गताच स्त्रीयांना सौंदर्याचा अमाप खजिना लाभला आहे..आणि या सौंदर्यापोटी पुरुषांच्या मनात प्रेम व वासना या दोन वेगवेगळ्या गोष्टीनी जन्म घेतला आहे...
     एखाद्या स्त्री  सौंदर्याकडे लोभस नजरेने पहाणे ती मिळवण्याचा अठाठ्हास करणे त्या मागे लागन ही झाली तुमची वासना ...एखाद्या स्त्री सौंदर्याकडे वासनेच्या नजरेने पहाणे म्हणजेच त्या सौंदर्याचा अपमान केल्यासारखे आहे...
            पण तेच सौंदर्य तुमच्या डोळ्यात साठवने ,मनाच्या एका गाभार्यात जपुन ठेवने ...किंवा त्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन करने ही त्या सौंदर्याला मिळालेली खरी पोचपावती ...
      सौंदर्याला सुद्धा भरपुर रुपं असतात...
कधी ते साध, सोज्वळ मनाला मोहवून टाकनार व्यक्तीमत्व असत ...तर कधी साज शृंगार
करुन आलेलं आकर्षक व्यक्तीमत्व असतं....कधी ते सांज प्रहारी साजन प्रतीक्षेत ताटकळतानाच व्यक्तीमत्व असत...तर कधी रात्रीच्या गर्द काळोखात रतक्रीडेत मग्न असलेल अनोख्या तृप्तीच व्यक्तीमत  असत.....कधी ते राग अनावर झाल्यावर तापट व्यक्तीमत असत तर कधी ते झोपेत असतानाच शांत ,निरागस व्यक्तीमत  असत......
खरच व्यक्तीमत्व तेच असतं आणि सौंदर्य ही तेच असतं पण आपण ते कोणत्या क्षणी ते कसे टिपतो याला खुप महत्व आहे ...
      खरचं कधी कधी वाटत की समुद्रा प्रमाणेच सौंदर्याला सुद्धा भरती येत असावी...कारण कधी कधी होत काय की मी तिला दररोज पहात असतो...परंतु एखाद्या दिवशी ती अशी काही दिसते जणू काही मी तीला पहील्यांदाच पहात आहे आणि जसजसे तिला आजुण पाहात जावे तसतसे तिचे सौंदर्य अजुन  खुलत जाते...अगदी डोळ्यातही साठवता येणार नाही असे....

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

___ मत: धिकार __

वार- मंगळवार
दि -  ७ एप्रिल २०१५

     खरचं एकमेकांना आपण कितपत ओळखतो हो ??
का आणि कसे ओळखतो , कि फक्त आपलेच अंदाज बांधत असतो ??
पण हे अंदाज बांधणे किंवा एखाद्याविषयी आपले मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे ?
         बर्याचदा आपण  पहील्या भेटीतच समोरच्याच्या बोलण्यातुन किंवा एकंदरीत वागण्यातुन तो कसा आहे याचे स्पष्ट मत आपल्या मनावर बिंबऊन घेतो....हे खरचं कितपत योग्य आहे ..?
       पण जर योग्य असेल तर कशावरुन ..?
काय पुरावा आहे तुमच्याकडे कि तो तसा आहे..
तुम्ही तुमच्या मनानेच त्याच्याविषयीची मतं तुमच्या मनात बनऊन घेतले आहेत...
कदाचित समोरचा तसा नसेलही किंवा असही असेल कि तुमच्या मनात त्याच्याविषयी काहीतरी वेगळ मत निर्माण व्हावे म्हणुन तो तसा वागत असेल , कदाचित त्याच आत्ताच व्यक्तीमत्व आणि नंतरच व्यक्तिमत्व वेगवेगळी असु शकतात ..काहीही असु शकतं...!
पण आपण का आपल्या मनानेच त्याचा अंदाज बांधायचा...?
       पहिल्याच भेटीत समोरच्याचा चेहरा ,त्याचा स्वभाव कधिच सांगत नाही....
        असा चेहरा पाहून  त्याच्या मनातले किंवा त्याचा स्वभाव कळायला आपल्याला आधी त्याच मन बनाव लागेल..
         अहो ! इथे आपण एका भेटीतच समोरच्याच मन जाणुन घेण्याचा प्रयत्न करतो...
पण कधी कधी वर्षानुवर्ष एकमेकांच्या सहवासात राहून सुद्दा आपण एकमेकांना नीट ओळखतोच असे नाही..
     हा आता हेच पहा ना ...हे वाचल्यावर तुमच्याच डोक्यात काय-काय प्रश्न आले असतील .... " कि आपण कोनाबद्दल काय मत केल होत किंवा आपल्याबद्दल कोणी काय मत बनऊन घेतल होत.."आणि त्याच आता काय झालं...अशा प्रकारचे..
        बर्याचदा माझ्याबरोबर पण असचं झालेल आहे...समोरचा माझ्याविषयी कधी कधी त्याच्या मनात त्याच्या मनाला पटतील अशी निरनिराळी मते निर्माण करतो....तर कधी कधी मीच समोरच्याच्या मनात माझ्या विषयी काही वेगवेगळी मते निर्माण करतो...कारण नंतर मला त्याच्या मनाचा भ्रमनिरास पाहून हायसे वाटते...
         आता काहींच्या मनात मला भेटलेली पहीली भेट आठवली असेल तर नक्कीच त्यांच्या चेहर्यावर एक आडवी चंद्रकोर नक्की  ऊमलली असेल....
असाो...
तर हे असं आपण एकमेकांचे असे अंदाज बांधत बसलो कि शेवटी भ्रमनिरास आपलाच होतो...
      का एखाद्याविषयी आपल्या मनात वेगवेगळी मत निर्माण करायची...
खरच तो असा आहे की नाही याची कोणतीही शहानिशा न करता...
हो आणि एखाद्याविषयी मत निर्माण केल्यावर ती फक्त तुमच्याकडेच ठेवा..उगाच दुसर्यावर लादने हे चुकीचेच ..
कारण मतं ही तुम्हीच निर्माण केली आहेत आणि तुमच्या मतानुसार समोरच्याने वागणे हे कितपत योग्य आहे...??
 
    असो व्यक्ती तितक्या वृत्ती आणि क्षण- क्षणाचे सोबती.....
   हे क्षणही असेच निघुन जातील...

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

माझा येडेपणा . . . .

कधी- कधी येडेपणाच किंवा
बालीशपणाच पांघरुन ओढूण घेतलेलंच बरं...
नाहीतर समोरचा आपल्यालडूण कळत- नकळत काही अपेक्षा ठेऊण बसतो..
आणि नंतर अपेक्षा भंगाचा त्रास हा जास्त त्यालाच होतो...
मि असं नाही म्हणत की, मि जबाबदारीला घाबरतो किंवा त्यापासुण लांब पळण्याचा प्रयत्न करतो...
पण ,
मला माझ्या पेक्षा,त्याच्यात वाटनारा मोठेपणा किंवा माझ्यापेक्षा त्याला जास्त समज आहे ..हे त्याच्या डोळ्यातील भाव
मला एक वेगळाच अनामीक आनंद देऊण जातात ......

( ता.क - हा आता तुमच्या मनातील काही प्रश्न बाजुला ठेवा
शेवटी...
व्यक्ति तितक्या वृत्ती आणि
क्षण- क्षणाचे सोबती....)

                                     

बुधवार, २५ मार्च, २०१५

टाईमपास ...

बुधवार
२४ मार्च २०१५

ब्लॉग जगतात असच हुंदाडताना मला एका गावातल्या एका घरात ( असंख्य ब्लॉग वाचत असताना त्यातल्याच एका  ब्लॉग मध्ये )
अशी प्रश्नांचि एक मैफिल आठळलि....
       खर तर या असल्या प्रकारतुन तुम्ही-आम्ही  थोडेफार गेलेलो आहोतच . म्हणजे मोबाइल वर या आशयाचे आधी बरेच संदेश मित्र वर्तुळात  ( friends circle ) मध्ये विचारण्यात आले होते .  
( e.g ..your best friend name ..?  favorite color ..?  etc etc )
असो.
तर हे अस आधी ही केल होत पण यात जरा वेगळेपण असल्याणे मला मझा हात आवरता आला नाही ..
आता तुम्ही म्हणाल काय याच हे नविन लचांड ..
.
.
तर पहा काय आहे ते...

ππππππππππππππππππππππππππππππππππππππππππππππππππ

1.Where is your cell phone ?

ऑफीस मद्ये असल्यावर खिशात नाहीतर डेस्क वर ....घरी आलो की शक्यतो पडलेलाच असतो कुठेपण .......
नाहीतर सौ.च्या हातात ...आमच्या दिवसभराच्या घडामोडिंचा तपशील पहाण्यासाठी ... ( आता कसला तपशील हे तुम्हाला कळलेलच असेल )
       हा आंतरजालावरच ( इंटरनेटवर ) मि जास्त वाचन करत असतो त्यामुळे घरी आल्यावर सुद्धा कधि कधि माझ्या हाताला चिकटलेलाच असतो ....
झोपताना मात्र त्याला त्याचा खुराक पाजुनच   
( charging ला लाऊन ) बाजुला ठेवतो ..

2.Your hair ?

शाहीद कपुर.....नाही नाही....उम्म्मम.....
विवेक ओबेरॉय ..काहीतरीच काय......
लसीद मलिंगा ......छे हो
आपले ते आपलेच आहते...तोडच नाही राव. ..
हा आता थोडे थोडे गळायला लागाले आहेत. त्यामुळे थोडा नर्वस आहे ..
बाकी केस वाढले आणि कापले नाही की आई वेळोवेळी त्याला कात्री लावतेच ...

3.Your favorite food ?

काही म्हणा पण मला जरा मांसाहार जास्तच आवडतो....त्यातल्या त्यात चिकन ,मटन तर ..
क्या बात...
वर बिर्यानि म्हणाल तर सोने पे सुहागा.... चायनिज ते सुद्धा आवडीने खातो...
बाकी बाहेर कधि योग आलाच तर ओळी भेळ खायला विसरत नाही....
आणि भुख लागल्यावर तर सगळच favorite होऊन जात...

4.Your dream last night ?

रात्री झोपताना मच्छर किंवा त्यांच्याच कुळातल्या तत्सम प्राण्यांचा त्रास न होता मस्त झोप लागने हे एकच स्वप्न जागेपणी पाहिले होते...
नंतर मध्यरात्री केव्हातरी जास्त उकडायला लागल्याणे खिडक्या उघडल्या व बेड वरुन उतरुन लादी वर पंख्या खालि पसरलो ....पण खिडक्या उघडल्याणे मच्छर किंवा त्यांच्या कुळातल्या तत्सम प्राण्यांणी येऊन रात्री झोपायच्या आधी पाहिलेल स्वप्न भंग केले ...

5.Your favorite drink ?

कोक-शोक सब आपनी जगह ,,,
पर पानी का काम सिर्फ पानी करता है....my god ( वाचवलस गं बाई करीना )

6.Your dream/goal ?

philosophy ;-) 
माझ्या ब्लॉग च्या नावाप्रमानेच "क्षण-क्षणाचे सोबती"  ....त्यामुळे हातात आहे तो क्षण आपला आणि तो आनंदाने जगायचा ....
किसने देखा शायद "कल हो ना हो" ....
( शाहरुख भाई ने बचाया )

7.Your hobby?

काय असतय हे......???
     खरं तर ह्या hobby नामक शब्दापुढे लिहण्यासाठीच काहीजण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात ..
खर तर त्यांचि आवड त्यांनाच माहीत नसते. किंवा hobby शब्दापुढे लिहण्यासाठी काहीजण कहीतरी आवड आवडुन घेतात ...
नंतर लिहल्यावर  guilty फील व्हायला नको .....
    माझी hobby तशी आता तुम्हाला कळलीच असेल ...न् त्यात मि माझी तारीफ स्व:ता कशी करनार ..  ;)

8.Your friends ?

नव्या,गण्या,योग्या,आमट्या,पक्या,देव्या, देशपांडे,जोश्या,रुश्या ब्ला..ब्ला...ब्ला....ब्ला ...ब्ला ब्ला ............
आणि तेच जर लईच जिगरी असतिल तर
त्यांच्या बापाच्या नावावरुन उद्धार झालाच म्हणुन समजा....
शाळेतले वेगळे ..ऑफीसचे वेगळे ..घराकडचे वेगळे ....वदन पुस्तिके वरचे वेगळे (Facebook)
अशे बरेच ....

9.Where were you last night ?

घरीच असनार ..बायकोने घराबाहेर सोडल तर नवलच ;-) 
आणि त्यात बाहेर निगालोच तर
मलापण यायच हा बाळअठ्ठाहस .....

10.Wish list item ?

एखादी 4 व्हिलर .......पण काही घाही नाही
येवढी ....
जमलच तर apple चं डिजिटल watch ..

11.Where did you grow up ?

बर्याच ठिकानी ...
लहाणपणी गावी ...म्हणजेच मु.किवळे ता. मावळ जि.पुणे
मध्यंतरी २ वर्षासाठी शाळेनिमीत्त मावशी कडे खडकीला ..
नंतर मात्र आतापरयेंत इथेच म्हणजे तळेगाव ..
भविष्यात कुठे असेल सांगता येत नाही ...कदाचित आधि खालि मग वर ....
प्रगति ही होतच रहानार हो ..

12.Last thing you did ?

वरचा topic लिहुन काढला ... ;-)

13.What are you wearing ?

आता ऑफीस मध्ये आहे म्हटल्यावर ऑफीस ने दिलेला ड्रेस कोड ....
काळी प्यांट आणि पांढरा शर्ट, त्यावर लाईट काळ्या रंगाच्या उभ्या लाईंन्स ...
पायात ब्लँक शुज ...माझ्या एका मैत्रिणीणे मला gift दिलेल मनगटी  घड्याळ ...
बस सध्या तरी येवढच आहे..
घरी गेल्यावर विचारु नका...
बनियाण आणि गुढग्यापरयेंत येईल अशी लाल रंगाची बर्मुडा....  ;)

14.Your TV ?

आता हा काय प्रश्न ? असो..
यंदाच्याच दिवाळित मि मस्त बार उडऊन दिला..
स्वस्तात मस्त असा एक 39' क्रोमा चा मस्त LED घेऊन आलो.....
हा पैसे आजुन फेडत आहे तो भाग वेगळा...

15.Your pets ?

आजुन तरी काही पाळीव प्राणी पाळलेले नाहीत....
    पण आमच्या सौ. ची खुप इच्छा आहे..की घरात एखाद तरी  म्यँव् म्यँव् किवा भो भो असाव ...
बगु त्या परिने प्रयत्न सुरु आहेत...
.
.
अहो काहितरीच अर्थ घेऊ नका हो...
म्हणजे बाहेरुन कोणी देतय का किंवा विकत आनता येतय का ....हे प्रयत्न.....!!! ;)

16.Your life ?

complicated, interesting, suspension, happy, lovely, horrible,sad,hardworking,
तुमच्या जे मनात येईल ते....

ये जीवन है, इस जीवन का
यही है, यही है, यही है रंगरूप
थोड़े ग़म हैं, थोड़ी खुशियाँ
यही है, यही है, यही है छाँव धूप
ये ना सोचो, इस में अपनी, हार है के जीत है
उसे अपना लो जो भी, जीवन की रीत है
ये जिद छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल इक दर्पण है
धन से ना दुनिया से, घर से ना द्वार से
साँसों की डोर बंधी है, प्रीतम के प्यार से
दुनिया छूटे, पर ना टूटे, ये कैसा बंधन है?

that's the my life ..

17.Your mood ?

अवधुत गुप्ते style - "एकदम झकास्स्स........"

18.Missing someone?

घरात राहायचंय राव मला..... ;-/

19.Vehicle?

हैं ना बॉस ....करीझ्मा Z  विथ ब्लँक कलर ...
जब रास्ते पे निकलति है ना ,तो हवा से बाते करति है......एकदम मस्का.............!!!

20.Something you’re not wearing ?

तस काही नाही हो....सध्या तरी सगळ घातलय अगदी आतपासुन ते बाहेर पर्येंत ......
        हा एकदा थंडीच्या दिवसात आकुर्डीला कॉलेजला असताना खाली जिंस आणि वर बनियण आणि त्यावर जर्किंग ...
शर्ट घालायच विसरुनच गेलो हो.......
आणि नंतर लेक्चर ला बसल्यावर ... खिशातला पेन काढावा म्हणुन जो हात घातलाय......... आहाआहाहा ...काय तो माझाच मला झालेला शरीर स्पर्श .....

21.Your favorite place?

कंपनिच्या बस मधे ड्रायव्हरच्या विरुध बाजुच्या लाईन मधल्या मागुन चार नं चि खिडकी शेजारची शिट ....
अहो ति जागा पकडण्यासाठी चक्क अर्धा तास आधि येऊण बसतो मी...
आणि त्यानंतर जो काही अर्ध्या तासाचा एकांत आहे......त्यात खिडकीतुन येनारा मस्त गार वारा.....कधि कधि असं वाटत stop चं येऊ नये अखंड चालु रहावी बस...

22. Your favorite color?

एखाद्या सुंदर मुलीने घातलेला कोणताही ... :-)

23.When was the last time you laughed?

रात्री झी मराठी वर लागलेला
' चला हवा येउद्या ' कार्यक्रम पहाताना निख्या आणि मि काय हसलो म्हणुन सांगु ....  ;)

24.Last time you cried?

रात्रीच,,,!!! हसुन हसुन डोळ्यातुन पानी
आल......!!! ;)

25.One place that you go to over and over?

whats app वर फिरायला आवडत कधी-कधी पण ते हि सध्या बोअर झालय ...
राहिल fb दिवसातुन एखादी चक्कर असते तिकडे सुध्दा...
हा आंतरजालावर त्यातल्या त्याल wiki            ( Wikipedia ) वर आज काल जास्तच पडीक असतो..

26.One person who emails me regularly?

सिम कार्ड पोस्टपेड असल्यामुळे वोडाफोन वाले बिला संदर्भात......
tv च्या हफ्त्या वाले........
मागेकधितरी snap deal वरुन काहितरी मागवल होत ..त्यामुळे ते सुध्दा हल्ली नविन ऑफर बद्दल सारखे आठवण काढत असतात...

27.Favorite place to eat?

आईच्या समोर......
दोन घास जास्तच जातात राव....
किंबहुना दोन घास जास्त खावेच लागतात...

***********************************************************************************

हुश्शशशशश.........झाल एकदाच. !!!

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

ति ....

१) ति  माझ्यासाठी अशी सुंदर पुष्पवेल होती की.. तिच्या सुंदरतेच्या पुष्पवेलीवरची जितकी फुले तोडावीत ना... तितकी तिच्यावर अजुण-अजुण सुंदर फुले उमलु लागत ..
 २) कधी कधी वाटत की... समुद्रा प्रमाणेच सौंदर्याला सुद्धा भरती येत असावी ... कारण , कधी कधी होत काय की मि तिला दररोज पहात असतो... परंतु एखाद्या दिवशी ति अशी काही दिसते ...जणु काही मि तिला पहिल्यांदाच पहात आहे.. आणि जसजसे तिला आजुन पहात जावे तसतसे तिचे सौंदर्य आजुन खुलत जाते.. ....अगदी डोळ्यातही साठवता येणार नाहीअसे... खरच ति माझ्यासाठी अजुनही तशिच आहे..

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

आठवणींच्या जगात


( नोट - वाचकांनी कृपया नोंद घ्यावी..कीमाझे मराठी व्याकरण जरा जास्तच कच्चे असल्या कारणाने ..लिहण्यात काही चुका आढळळ्यास त्या नजर चुकीने टाळाव्यात ....सुधारणा चालु आहे...चुकांसाठी क्षमस्व.. )                                           


  ..... तर हे सारे लिहण्याचा हठ्ठाहास यासठी की १३ फेबृवारी ला असाच ऑफीस मधुन घरी आलो होतो...फ्रेश होऊन जरा बसलोच होतो की...आमच्या लाडक्या साली सायबा मिस   प्रतिमा यांचा msg आला ..
" काय जिजु ..ताई ला काय गिफ्ट घेतल वेलंटाईन डे निमित्त......."
तेव्हा मला कळल की उद्या वेलंटाईन डे आहे..
प्रेमाच प्रतिक असलेला दिवस ....
आणि याच दिवशी काही वर्षांपुर्वी  माझ्या मित्राच्या  आयुष्यात घडलेला हा किस्सा ....
या डे निमित्त तुमच्यासमोर मांडायला सुचल ...                                                                                                
आज दि.२८ फ़ेब्रुवारी २०१५
आज पासुन बरोबर मागे १४ दिवसांपुर्वी  म्हणजेच १४ फ़ेब्रुवारी ला  वेलंटाईन डॆ साजरा झाला ....खर तर हा लेख मी त्या दिवशीच लिहायला घेतला होता पण शब्दांची जुळवा-जुळव आणि आठवणींना ऊजाळा देता देता
आज हा लेख लिहुन झाला.

१४ फेबृवारी म्हंणजेच वेलंटाईन डे ..
पाश्चात्य संस्कृतिने परिधान केलेला हा पोषाख आता हळुहळु ( हळुहळु म्हनण्यापेक्षा जवळजवळ ) सगळ्याच  राष्ट्रांनी नी परीधाण केलेला दीसत आहे..
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणुन हा दीवस ओळखला जातो...खर तर प्रेम व्यक्त करण्यासाठी वीशीष्ट असा  दिवसच असला पाहिजे का ?? ( मला नाही वाटत )
तर या दिवशी आपले प्रेम व्यक्त केले जाते भेले ते कोणत्याही नात्यातले का असेना.................
( नात्याला काही नाव नसावे .....असे आत्ताच मितवा सांगुन गेला )
असो....

माणसाच्या आयुष्यात दु:ख तर खूप असतात पण प्रत्येक जन हे दु:ख विसरून पुढचे आयुष्य जगत असतॊ  पण कधी कधी आयुष्यात असेही क्षण येतात ज्यावेळेस काही जुन्या आठवणी मनावर ताबा घेतात आणि तेव्हा नकळत त्या आठवणीत डोळे कधी भरून येतात तेच कळत नाही.. मग का कुणास ठाऊक पुन्हा त्याच क्षणांची त्याच दिवसांची हे मन पुन्हा मागणी करते.. खरच आयुष्यात जगलेले क्षण पुन्हा हवेच असतात पण ते शक्य नसते, पण मग तरीही का बरे हे मन  त्या क्षणांच्या मागे धावत असते.. ..
शेवटी आयुष्याचे गणित कोणाला उलगडले आहे तेव्हा मला उलगडेल.....

पौंगाडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुटु लागतात ..त्यावेळीस आपल्याला जात-पात ,उच्च-निच्च ही कसलिच कुंपने माहीत नसतात ...त्याला फक्त एक अनामीक ओढ लागलेलि असते ...प्रेमाची

आपल पहिल प्रेम ...आपल्यालाच कळत नसत नेमक काय आहे हे ...तो उमलण्याचा काळच असा असतो . त्याला फक्त वाहण माहीत असत ..
ह्या वयात आल्यावर आजवर केवळ ऐकलेले किंवा आजुन त्या शब्दाचा स्पर्श ही न झालेला तरुन हे जेव्हा स्वता फील करु लागतो ..तेव्हा त्याला सार जग हे वेगळ भासु लागत ,छान वाटु लागत .......
पण भुतकाळात मागे डोकावताना असे काही क्षण असतात जे सर्वस्वी आनंदाई असतात जे पुन्हा पुन्हा आयुष्यात येऊशी वाटतात ....
पण आता ते काही येनार नाहीत कारण ते आता आठवणींच्या स्वरुपात मनाच्या डायरीत जमा ज़ालेले असतात....

थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांच्याच  आयुष्यात अशाच काही कडु- गोड आठवणिंच वलय असत . सुखद , मनाचा अलगद ताबा घेनार ....आपण त्याच्या भोवतिच घुटमळत असतो...

अशीच माझ्या एका मित्राची सुखद आठवण,,,,,

शाळा...............
शाळा कोणाला नाही आवडत? आपल्या सगळ्यांनाच आवडते. कितीही मोठे झालो तरी शाळेतले दिवस विसरू शकत नाही..
आपण घडतो,शिकतो,सावरतो ते ईथेच.आयुष्यातले पहिले मित्र इथेच भेटतात.
( इथे भेटलेले मित्र हेच फ़क्त आपले खरे मित्र आणि सोबती असतात
नंतर भेटलेले मित्र मात्र  मि आणि ते ईतरत्र  असे होतात )
पहिले प्रेमही इथेच होते.
एवढेच न्हवे तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या शाळाच शिकवते..
तर अशा या शाळॆत अशीच एक मुलगी होती....

सोनल ......
लाजरी..गुबरी..अवखळ..खेळकर..उनाड....
नाजुक बांधा त्यावर स्वच्छ पांढरा शर्ट आणि खाली नीळ्या रंगाचा स्कर्ट , छोटेसेस पण मुलायम केस आणि त्यावर तो लाल रंगाचा हेअर बन्ड, तेच सुंदर निरागस डोळॆ
आपल्याच विश्वात रमनारी ती...
तो......
तिच्याच सारखा...शेवटी तिचाच मित्र ना....
दोघांच वय जेमतेम सारखेच ,शेवटी एकाच वर्गात होते म्हटल्यावर वय हे सारख असनाराच
त्यांची ओळख झाली ती पाहिल्यांदा ५ वी.मध्येे असताना ...ओळख झाली म्हणण्यापेक्षा........( ह्या वयात ओळख होणे म्हंणजे काय , हे पण माहीत नसाव कदाचित ) 
तर हे दोघे ५ वी. त असल्यापासुनचे एकमेकांचे मित्र ..
एकत्र खेळणे , एकत्र अभ्यास करणे आणि एकमेकांशी भांडण करणे असा त्यांचा नित्यनियम ...
तसे त्याला मित्रही होतेच आता शाळेत असल्यावर पुर्ण वर्ग हा आपल्या ओळखीचा असतो...इथे सगळेच एकमेकंचे मित्र असतात
पण त्याची ति एक मैत्रिन , तो फक्त तिच्याषीच बोलायचा ..जास्त नाही पण जो काहो मुलिंसोबत संबंध येइल त्यात तो तिच्याशिच बोलत असे ....
असेच ५वी. ते ७वी. हे तिन वर्ष खेळता खेळता निघुन गेले
आता ते दोघे ८ वी.ला आले होते
मराठी शाळेमधुन न्यु इंग्लिश स्कुल मध्ये..
शाळा  बदालली वर्ग बदलला काही नविन मित्र आता जुन्या मित्रांमधे add झालेले ...
पण जसजस दिवस जाऊ लागले तस तसे त्याला काहीतरी वेगळेपण भासु लागले ...
वेगळ जे पहील कधी झालच नव्हत  .
शाळेतले पहिल्यासारखे दिवस आता राहिले नव्हते ..ते एक-मेकांची खोड करणे ,ति मस्ती ते बिंदास्त मुलींशि बोलण काही काही राहिल नव्हत ....
नक्की त्याला काय होतय हे त्याच त्यालाच कळत नव्हत ..
साप जशी  आपल्या आंगावरची जुनि कात काडुन नवीन कात धारण करतो तस काहीस त्याला जाणवत होत ..
तिच्याकडे पहताना सुद्धा त्याला एक प्रकारची भिति वाटत होती...
पण त्या पहाण्यात सुद्धा आता एक प्रकारच वेगळेपण आल होत ,
डोळ्यात आता एक वेगळीच नशा दिसत होती
तिच्याकडे पहताना नकळत गालावर खळी पडत होती ....
समोर टिचर शिकवत असताना आणि पुर्ण वर्गाच्या नकळत तिच्याकडे पहताना त्याला मिळनारा तिचा समिश्र प्रतिसाद सार काही सांगुन जात होता ...
ते दोघे आता त्यांच्याच विश्वात रमायला लागले होते ..त्यांच्या या जगात आता नावीन पालवी फुटु पहात होती.. त्या पालवीला आता नवनविन दररोज फुले फुलु पहात होती ..
त्यांच्या  या जगाला मात्र नाव काय होत हे त्यांच त्यांनाच माहीत नसाव,
एकमेकांना चोरुन पहाने...
नजरेतूनच हसने , नजरेतूनच रागवने  सारे सारे काही नजरेतूनच बोलायचे.. दुसऱ्यांना कळो किंवा न कळो पण त्याच्या  नजरेची भाषा तिला आणि तिच्या नजरेची भाषा त्याला  नक्कीच कळत होती ....
तिचा विचार केला तरी त्याला लाजल्यासारख व्हायच..सतत तिचाच विचार डोक्यात ..मनात सतत एक प्रकारचि हुरर्हुर ...त्याला तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ लागलेली ...त्याला कळत नव्हत नेमक काय होत आहे ते..तो फक्त त्या प्रहावात वहात चालला होता ..
तो  कुठे वहात चालला होता ,त्याच त्यालाच  ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… त्याचही तस्संच झालं होतं..
अशा या तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊण सुद्धा त्याला कळत नव्हत नेमक काय होत आहे हे...
कदचित हे समजण्याइतपत शहानपण आजुन तरी त्याच्यात आले नसावे...

पौंगंडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुलु लागतात..त्यावेळीस आपल्याला जात-पात,उच्च -निच्च ही कसलीच कुंपणे माहीत नसतात ...आपल्याला फक्त एक अनामीक ओढ लागलेली असते ...प्रेमाची
आपल पहिल प्रेम ...आपल्यालाच कळत नसत नेमक काय आहे हे ...हा उमलण्याचा काळच असा असतो . आपल्याला फक्त वाहण माहीत असत ..
ह्या वयात आल्यावर आजवर केवळ ऐकलेले किंवा आजुण त्या शब्दाचा स्पर्श ही न झालेलो आपण  जेव्हा स्वता फील करु लागतो ..तेव्हा आपल्याला  सार जग हे वेगळ भासु लागत ,छान वाटु लागत ..........
असच ते वर्ष ते दिवस लपंडाव किंवा ऊन सावळीचा खेळ खेळता खेळता निघुन गेलं...

प्रेम.......
प्रेम मोकळ असत का? की खरच त्याला काही बंधन असतात.
वेळेच बंधन असत का त्याला?
रोज रोज दिसणारे ते चेहरे आणि त्याच्याबरोबर लहाणाचे मोठे झालेलो  आपण , अचानक एके दिवशी पोरके होतात , एकदम अचानक..........
अचानक रस्ते वेगळे होतात ,ध्येय वेगली होतात आणि मग प्रवास सुरु होतो ..... एकट्याचा
तसच काहीस याच्या बरोबर झाल ..
ध्येय प्राप्तीसाठी नविन जगात आपल पाउल उमटवण्यासाठी त्याणे दुसरीकड Admission घेतले....

प्रेमात काही गोष्टी कधीच विसरता येत नाही.. आणि जर सगळ्या गोष्टी माणूस विसरला तर ते प्रेम कसले.. प्रेमात जगलेला प्रत्येक क्षण हा एक वेगळा अनुभव देऊन जात असतो आणि जेव्हा हे प्रेम दूर जाते तेव्हा मात्र ते आठवणींची चादर पांघरायला देऊन जात असते.. मग नकळत या आठवणीत माणूस हरवून जातो आणि त्यानंतर अनुभवणारी प्रत्येक गोष्ट जणू त्यास ओळखीची वाटत असते.. त्या वाटा, तो पाऊस, तो समुद्र किनारा, आणि राना वनातून भटकताना पायाखाली दबलेल्या तो पाचोल्याचा आवाजही ओळखीचा वाटतो..
अशाच आठवणीत व  शिक्षणात पुढची ३ वर्ष गेली...

कॉलेज  १२ वी. च वर्ष
सळसळ्नार रक्त ,नविन स्वप्न ,नविन जग
कॉलेज म्हणजे धमाल, कॉलेज म्हणजे मस्ती, कॉलेज म्हणजे मैत्री आणि कॉलेज म्हणजे प्रेम.. कॉलेज म्हटले की अभ्यास कमी आणि या गोष्टी आल्याच पाहिजेत.. त्याशिवाय कॉलेजला आणि तरुणाईला अर्थच राहत नाही.. तुम्हीही ही धमाल मस्ती केलीच असेल.. शाळा सुटल्यावर नवीन मित्र, नवीन वर्ग, नवीन कॅन्टीन सगळे काही नवीन आणि यात बंधनही नाही कोणाचे.. आयुष्यात सगळ्यात आनंदाचे क्षण म्हणजेच कॉलेज अस
कॉलेज लाईफ़ तो एंज्वाय करत होता..मित्रांसोबत दंगा मस्ती, लेक्चर बंक करुन कुठेतरी मस्त फ़िरायला जाने..लेट नाईट घरी येणे हे आता नित्याचेच झाले होते..
अशा या धम्माल मस्ती मध्ये हे वर्ष ही संपत आले होते..
पहाता पहाता १२वी. चि बोर्डाची परीक्षा जवळ आली होती...

फ़ेब्रुवारी महीना असेल प्रक्टिकल्स चे दिवस होते..सकाळी प्रक्टिकल करायचे आणि कॉलेज बाहेर ग्राउंण्ड वर येऊण मित्रांसोबत गप्पा मारत बसायच आणि संध्याकाळी घरी जायच अस रुटीन चाल्ल होत त्याच ....
असच एक दीवस दुपारचे साधारण २-२:३०  वाजले असतिल फेबृवारी महिना असल्यामुळे
ऊन जरा जास्तच आपली ताकद पणाला लावत होतं...मैदानात एका कोपर्यात ४-५ झाडांची छान सावली पडली होती. तेथे तो व त्याचे काही मित्र जाऊन पोहचले व गप्पा मारु लागले...
खर तर आज त्याला घरी जाऊण अभ्यास करायचा होता पण तो शंकर चि वाट पहात तेथे मित्रांसोबत वेळ घालवत होता ...शंकर तसा दुसर्या कॉलेज ला होता पण त्याचा एक्झाम नं. ह्या कॉलेज ला लागला होता तेव्हा शंकर त्याच्या रीसीट वर प्राचार्यांचि स्वाक्षरी घेण्यासाठी येनार होता ....
तो मित्रांसोबत गप्पा मारत बसला असताना त्याच लक्ष एका मुलींच्या ग्रुप कडॆ गेल,
त्यातली एक मुलगी त्याचकडॆ पहात होती...
२ मि त्याला कळायला वेळ लागला कि कोण ही ? पण त्याणे तीला ओळखले...होय
सोनल ,,,सोनलच ती दुसरी कोणी असुच शकत नाही ..
त्याला क्षणभर स्वताच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही...अचानक त्याची ह्रुदयाची धड्धड वाढली , हाता पायांना घाम फ़ुटला
कधी हरवलेले प्रेम पुन्हा भेटले आहे का तुम्हाला? काय अवस्था होती त्यावेळेस तुमची? बोलण्यासाठी शब्दही नसतात..
त्याला आता या क्षणाला काय कारावे काही काही सुचत नव्हते ......तो स्तब्ध नजरेने फक्त तिच्याकडे पहात होता ..
वर्याचि एक निखळ झुळुक अंगाला स्पर्श करुन जाते आणि तो स्पर्श मनाला ही होतो . मग मनही उडु लागत वार्या बरोबर आणि घेऊण जात पुर्विच्या जगात ...
हो ते जग पुर्विच कधी झाल कळलच नाही ..
सरला बराच काळ , बदलल्या बर्याच गोष्टी
पण तरिही त्या सुखद आठवणींच्या सुखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठेतरी दडऊन ठेवल्या होत्या ..त्या आत एका क्षनात त्याच्या मेंदुपटलावर उमटु लागल्या ...
त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद दिसत होता ....पण हा कसला आनंद ? तिला खुप दिवसांनी पाहिल याचा की आपल काहितरी हरवल होत आणि ते खुप दिवसांनी मिळाल याचा .
पण जर हरवलच होत तर त्याणे ते का हरु दिल होत.... पण खरतर
काही गोष्टी  त्यावेळीस हळुच सोडुण द्याव्या लागतात .
आपण कितिही प्रयत्नांचि पराकष्टा केली तरी निदान त्या वेळीस तरी त्या आपल्याला आपल्या करता येत नाही ..
पण गमत म्हंणजे नंतर ति गोष्ट आपल्याला
कुठेतरी नकळत मीळुन  जाते ..तेव्हा ति गोष्ट मिळाल्याचा आनंद काही औरच असतो ..
अगदी तसाच आनंद त्याला आता या क्षणी झाला होता ...
पण त्याला या परीस्थीतीत नेमक काय कराव कसं वागव काही काही सुचत नव्हते....

हे सर्व चालु असताना त्याला मागुण कोणीतरी त्याचा खांदा धरुन हलवल्यासारख झाल ..
तो क्षणात या सर्वातुन बाहेर आला ..मागे वळुन पाहु लागला कोण आहे ते ...
शंकर त्याचाच जिवळग मित्र ..
त्यांच्या मैत्रीला जास्त जुणी ओळख नाही म्हणता एणार मागच्याच वर्षी त्याची आणि शंकर ची ओळख झालेली ति सुद्धा तो hostel मध्ये रहात होता तेव्हा.
ते एका क्लासमध्येही नव्हते किंवा एका कॉलेज मध्ये ही नव्हते ... पण म्हणता ना जिवाला जिव देनारी माणसे कधी ,कुठे भेटतिल सांगाता येत नाहीत तसच काहीस ....
त्याच्या मनात एखादी गोष्ट चालु आहे आणि ति शंकर ला माहिती नाही अस कधी होतच नसे....
तसच ह्या सोनल बद्दल सुद्धा ..
तो जेव्हा शुन्यात कुठेतरी सोनल कडे पहात होता तेव्हाच शंकर ने ओळखल होत ही कोन  असावी ...त्यामुळे त्याला शंकर ला काही जास्त सांगण्याचि गरज नाही भासली.
ति आजुअही त्याला पहात होती ..
पण त्याला आता काय कारवे सुचत नव्हते
पण शंकर आल्या मुळे त्याला आता जरा हायसे वाटले होते ...
शंकर ने त्याची हि चल बिचल ओळखलि
शेवटी शंकर नेच पुठाकार घेउन चल तिच्याकडे असे म्हटले ....
आता काही जास्त ओढेतावे न घेता तो ही शंकर बरोबर तिच्या दिशेने चालु लागला होता..
तिची नजर त्याच्यावरच खिळली होती आणि आता तो ही चालता चालता तिच्या नजरेला नजर भिडवत चालत होता...मनातल्या असंख्या प्रश्नचि किवा उत्तरांची जुळवा जुळव करत ...... ..
ति पण त्याच्या डोळ्यात पहात होती .
पण कोणत्या नजरेणे !
खरच का तिने त्याच्या डोळ्यातला पवित्र अन् मंगल भाव जाणला होता ?
अस म्हणतात कि स्त्रि ला इश्वराने एक अशी शक्ति दिलेली असते कि ज्यावरुन ति पुरुषाच्या एका नजरेतुन त्याच्या मनातिल भाव ओळखु शकते .
पण खरच का तिणे त्याची नजर ओलखली असेल त्याच मण जानल असेल .
या विचारंच्या चक्रात असतानाच तो आणि शंकर कधी  तिच्याजवळ पोहचले कळलच नाही...ति सुद्धा आता तिचा गृप सोडुन जरा बाजुला आली होती ..

तो , त्याच्या थोडा मागे शंकर त्याच्याच बाजुला आणि सोनल एक - दोन हाताचे अंतर ठेउण पुढे उभी होती..
कोनतेतरी  प्रक्टीकल संपल्यामुले ग्राउंडवर आता बरेच मुले-मुलि जमले होते ..
मघाशी शांत असलेल्या मैदानाने आता
गडबड आणि गोंधळाची जागा घेतली होती ..
त्याची तर अवस्था एखाद्या पुतळ्यासारखी झाली होती......मघाशी तिला एक टक पहानारे डोळे आता उगाचच ईकडे तिकडे भिरभिरत होते ....अंगाचा तिला न जानवनारा सुश्म असा थरकाप चालला होता ......घामाने ओला झालेला हात ....गीळालेली थुंकी सुद्धा एखाद्या वाफे सारखी तोंडात विरुन जात होती ....
शेवटी तो कोणत्या परिस्थीतित आहे याची जानीव तीला  झाली असावी आणि तिने
शांत आणि गोड आवाजात प्रश्न केला
कसा आहेस ?
कसा आहेस ? या तिच्या प्रश्नाचे उत्तर आता नेमक काय द्यावे ...
कारण मगाशी काही क्षनापुर्वी तु दिसायच्या अगोदर तो खुप छान मजेत होतो,,,,,पण आता ती दिसल्यानंतर कसा असेल तो  ?

काही वेळ अशीच निगुन गेली ...त्याच्या तोंडातुन तर ब्र देखील निघत नव्हता ...काय बोलाव त्याला काही सुचत नव्हते,,,
शेवटी शंकर ला याची जानिव झाली असावी त्यानेच त्या शांततेचा भंग करत त्याला मागुन हालवत सांगितले " अय्य्य्य्य बोल ना ""
शेवटी त्याने स्वताला कसेबसे सावरत "ठीक आहे "... असे प्रतीउत्तर दिले...
इथे फ़क्त २ ते ३ मि .त्यांच संभाषण झाले असेल पण ह्या २ ते ३ मि. तो नेमक काय बोलला व ति काय बोलली हे तो आजुनही आठवत आहे ..

दुसर्या दिवशी तो आणि शंकर  सकाळीच कॉलेज ला निघाले ,आज १४ फेबृवारी हा दिवस होता मनातल्या मनात त्याने काहीतरी ठरवले होते...
तो तिची वाट पहात मैदानातच उभा होता,,
शेवटी ति आली आणि तो तिला सामोरे गेला....परत एकदा त्यांच्यात संभाषण सुरु झाले ...
ह्या वेळीस तो पुर्ण शुद्दिवर होता ति काय काय बोलत आहे तो काय उत्तर देत आहे हे त्याला पुर्ण समजत होते
खरच ति त्याला हे पुर्ण वर्ष त्याला ह्या कॉलेज मधे पहात होती....त्याला दिसला कि बोलवत होती पण याचे एकदाही तिच्याकडॆ लक्श गेले नाही..असे तिच्या बोलण्यातुन समोर आले.....

प्रक्टिकल्स संपले , आता एक्झाम सुरु झाल्या होत्या ...
दररोज कॉलेज ला जायच तिला पहायच आणि परिक्षेला बसायच.....खरच त्या पेपरात लक्ष लागल असेल का त्याच...
अखेर शेवटचा पेपर सुद्धा संपला ...मनात एक प्रकारची हुरहुर ..परत भेट होइल की नाही.काही काही माहीत नाही.
काय बोलावे काय करावे काही काही सुचत नव्हते...शेवटी ओल्या पापण्याने आणि
हसर्या चेहर्याने दोघांनी एक मेकांचा निरोप घेतला .......( तो शेवटचाच होता )
.
.
.
पुढच्याच महिन्यात त्याचा एक मित्र त्याच्याकडे एक लग्न पत्रिका घेउन आला....
त्यावर तिच्याच सुंदर हस्ताक्षराने लिहलेले नाव होते...
                      - तेजस चिमटे

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

असच काहीतरी..

वेळ कूणासाठी थांबत नाही आणि आपणही आपल्या रत्यावर चालत राहतो, न थाबंता. त्या रत्यावर मग काही आपले भेटतात जे शेवटपर्यंत साथ देण्यास तयार असतात तर काही अर्ध्यावरच साथ सोडतात, पुढे वळणं येतात, चढ उतार येतात आणि विश्रांतीची जागाही येते. भूतकाळातले हिशेब मांडायला ही जागा चांगली. नूसतेच ऐहिक हिशेब नाहीत तर नात्यांचेही हिशेब.

वार्याची एक नीखळ झुळूक अंगाला स्पर्श करुन जाते, आणि तो स्पर्श मनालाही होतो.
मग मनही उडु लागतं वार्या बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.

पण तरीही त्या गोड-कडू आठवणींच्या सूखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठतरी दडवून ठेवल्यात. का कुणास ठाऊक?

या आयुष्याच्या वाटेवर खुप माणसे भेटतात,
काही निघुणही जातात
" ज्याना जायच असत ते आपला ठाव ठिकाना सांगुण नाही जात
ज्याना परतुन यायच असत ते नेहमी आपली चाहुल सोडुन जातात ..
मागे उरतात त्या आठवणी...
काळानुरुप त्याही निघुण जातिल.."

अशाच काही आठवणींची , कडू-गोड स्वप्नांची ही शिदोरी " क्षण-क्षणाचे सोबती " या ब्लॉग मार्फत तुमच्या पुढ्यात...