दि . .२९ जुन २०१६
वेळ . . ०८ : ००
अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!
खुप अनोळखी माणसं मला बोलतात , कि तु तुझ्या मनातलं लगेच कसं सांगतोस किंवा लगेच असा कसा एखादयावर विश्वास ठेवतोस ...
खरं तर हिच माणसं मला ओळखीची आणि विश्वासातली वाटतात . काहीच घेणं - देणं नसतं अशा लोकांकडून कारण ऋणानुबंध जुडलेले नसतातच ना ?
त्यामुळे समोरच्याला ते पटतंय कि नाही याचा विचार मी नाही करत .मी माझ मन मोकळ करत असतो बस .
खर तर ओळखीच्या माणसांना सांगण्यापेक्षा हे खुप बरं असतं ... कारण की होत काय की ओळखीच्या माणसांना सांगायला गेल तर आपण जे सांगीतल आहे ते समोरच्या पर्यंत पोहचले की नाही याची भीती जास्त वाटते .
खरतर माणसाला दुसऱ्याची दुःख जाणून घेण्यात आनंद वाटतो ... का वाटतो माहीत नाही ?
पण ठिकय त्या कारणाने का होईना समोरचा आपल्याला समजुण घेतोय हे महत्त्वाचे ..
चेहरे अजनबी हो जायें
तो कोई बात नहीं,
रवैये अजनबी हो
तो तकलीफ देते हैं !!
नमस्कार मित्रहो , मी तेजस , तेजस श्रीरंग चिमटे . एक वाचक , एक श्रोता , एक भटक्या , कवी मनाचा आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी . सहज कुणात मिसळत नाही . पण मिसळून गेलो कि स्वतहा मी मीच उरत नाही . असे म्हणतात गेलेले क्षण पुन्हा परत येत नाहीत, पण ते क्षण पुन्हा नव्याने अनुभवता येतात. आठवणींच्या स्वरूपात .. त्याचाच हा छोटासा प्रयत्न ..!!
गुरुवार, ३० जून, २०१६
अनोळखी .... पण ओळखीचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खरं आहे तुमचं म्हणणं,
उत्तर द्याहटवाखूपच छान तेजस. अगदी मनातलं बोललास
उत्तर द्याहटवाखुप बरे
उत्तर द्याहटवाखुपच छान सर अगदी मनातल शब्दात मांडले.
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाKhoop chan lekh aahe 👍🏻👍🏻👍🏻😊
उत्तर द्याहटवाI love your article. you can visit my website eBay Apk
उत्तर द्याहटवा