वार- बुधवार
दि- २२ एप्रिल २०१५
स्त्री- सौंदर्य
एक अशी गोष्ट जी मनाला मोहून जाते....
एक अशी गोष्ट जीच्याकडे पहाताच एक वेगळीच अनुभूती येते....
एक अशी गोष्ट जीला फक्त पहातच रहावे .....
एक अशी गोष्ट जीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात .....
एक अशी गोष्ट जीच्यामूळे रणसंग्राम लढले गेले....
एक अशी गोष्ट जीच्यामुळे ताजमहाल बांधले गेले.....
एक अशी गोष्ट जीच्यासाठी कविता रचल्या जातात.....
खरचं बोलावे तितके अपुरेच !!!
तुम्ही कधी उंच डोंगरावरुन कोसळणारा धबधबा पाहीला आहे का ?
किंवा संध्याकाळच्या वेळी होणारा सुर्यास्त ?
किंवा सकाळी - सकाळी बागेत उमललेल गुलाबाच फुल ? नाहीतर प्रवास करताना एखाद्या आईच्या कडेवर असलेल तिच गोंडस बाळ ? किती सुंदर गोष्टी असतात ना या ?
मनाला किती मोहवून टाकतात .
पण खरचं आपल्या मनाला मोहवून टाकणार्या गोष्टी सुंदर असल्याच पाहीजेत का ?
आपल्या नजरेत आपल्या पाहाण्यात जर सुंदरता असेल तर आपल्याला आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट सुंदर दिसेलच की ...आपण फक्त त्या नजरेने त्या गोष्टी कडे पहायला हव ..
एखादी सुंदर मुलगी शेजारुन गेली आणि तिला मागे वळुन पहाण्याचा मोह आवरता नाही आला तर नवलचं....
निसर्गाने खरचं पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या बाबतीत हे पारडं जरा जडच ठेवलेल आहे ..
खरचं स्त्रीयांच्या सुंदरतेच वर्णन करायच म्हणजे एक अशक्यप्राय गोष्टचं आहे..
बर्याच कवींनी, गीतकारानी ,लेखकांनी स्त्रीयांना आप -आपल्या परीने खुप सोंदर्य प्राप्त करुन दिले आहे... ..तरीपन ते कुठेतरी उणेच भासते ..
एखाद्या स्त्रीचा कमनीय बांधा तुम्हाला आकर्षित करु शकतो ...तर एखाद्या स्त्रीचे मृगनयनी डोळे तुम्हाला भुरळ घालु शकतात ...
एखाद्या स्त्रीचे वक्षस्थळ तुमची नजर खिळवुन ठेवु शकतात .....तर एखाद्या स्त्रीचे गुलाब की पंखुडी जैसे ओठ तुम्हाला वेड लाऊ शकतात ....
कुणाचे लांब सडक जर्द काळे केस डोळ्याचे पारणे फेडु शकतात...कुनाच लटकचं लाजन किति आकर्षक वाटत तर कुनाचं हास्य म्हणजे न भुतो ना भविष्य !!.....कुनाचं रडन तर कोनाच रागावनही तितकच मोहक ...कुनाचा मंजुळ सुमधुर आवाज तर कुनाची हरणा सारखी मोहक चाल....खरचं बोलावे तितके कमीच नाही का...?
छोटसं भांडण झाल्यावर समजुत काढण्याच्या उद्देशाने एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला घट्ट मीठीत घेऊन तीच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेणं ,त्यावेळी प्रेयसीच्या डोळ्यात असलेली शरम तिच्या गालावर आलेली लाली ...असच प्रियकराच्या मीठीत रहावं हे मनोमनी वाटुन सुद्धा ...त्याच्या मिठीतुन सुटण्याचा तिचा खोटा अठ्ठहास .... अहाहाहाहा.......खरच एक विलक्षण अनुभुती...!
बायको स्वयंपाक घरात काम करत असताना नवर्याने मागुन हळुच येऊन तीला मारलेली घट्ट मिठी....त्यावेळचं तिच ते लटकचं रागावन ,गालातल्या गालात लाजन ...मनात नसतानही सोड सोड असा हठ्ठहास करणं...आणि हे सर्व अनुभवता नाही आल तर तो नवरा कसला....
निसर्गताच स्त्रीयांना सौंदर्याचा अमाप खजिना लाभला आहे..आणि या सौंदर्यापोटी पुरुषांच्या मनात प्रेम व वासना या दोन वेगवेगळ्या गोष्टीनी जन्म घेतला आहे...
एखाद्या स्त्री सौंदर्याकडे लोभस नजरेने पहाणे ती मिळवण्याचा अठाठ्हास करणे त्या मागे लागन ही झाली तुमची वासना ...एखाद्या स्त्री सौंदर्याकडे वासनेच्या नजरेने पहाणे म्हणजेच त्या सौंदर्याचा अपमान केल्यासारखे आहे...
पण तेच सौंदर्य तुमच्या डोळ्यात साठवने ,मनाच्या एका गाभार्यात जपुन ठेवने ...किंवा त्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन करने ही त्या सौंदर्याला मिळालेली खरी पोचपावती ...
सौंदर्याला सुद्धा भरपुर रुपं असतात...
कधी ते साध, सोज्वळ मनाला मोहवून टाकनार व्यक्तीमत्व असत ...तर कधी साज शृंगार
करुन आलेलं आकर्षक व्यक्तीमत्व असतं....कधी ते सांज प्रहारी साजन प्रतीक्षेत ताटकळतानाच व्यक्तीमत्व असत...तर कधी रात्रीच्या गर्द काळोखात रतक्रीडेत मग्न असलेल अनोख्या तृप्तीच व्यक्तीमत असत.....कधी ते राग अनावर झाल्यावर तापट व्यक्तीमत असत तर कधी ते झोपेत असतानाच शांत ,निरागस व्यक्तीमत असत......
खरच व्यक्तीमत्व तेच असतं आणि सौंदर्य ही तेच असतं पण आपण ते कोणत्या क्षणी ते कसे टिपतो याला खुप महत्व आहे ...
खरचं कधी कधी वाटत की समुद्रा प्रमाणेच सौंदर्याला सुद्धा भरती येत असावी...कारण कधी कधी होत काय की मी तिला दररोज पहात असतो...परंतु एखाद्या दिवशी ती अशी काही दिसते जणू काही मी तीला पहील्यांदाच पहात आहे आणि जसजसे तिला आजुण पाहात जावे तसतसे तिचे सौंदर्य अजुन खुलत जाते...अगदी डोळ्यातही साठवता येणार नाही असे....
Very good blog
उत्तर द्याहटवाप्रेमात हे असाच होत
उत्तर द्याहटवाNice dude
उत्तर द्याहटवासुन्दर
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाkharch khup chan...
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान वर्णन केलंस
उत्तर द्याहटवाएखाद्या स्त्री सौंदर्याकडे वासनेच्या नजरेने पहाणे म्हणजेच त्या सौंदर्याचा अपमान केल्यासारखे आहे...
उत्तर द्याहटवाHe smjutich mhanan khup kmi vela vachnyat yet . Aj tumhi lihil te khrch sundr ahe sir