मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

___ मत: धिकार __

वार- मंगळवार
दि -  ७ एप्रिल २०१५

     खरचं एकमेकांना आपण कितपत ओळखतो हो ??
का आणि कसे ओळखतो , कि फक्त आपलेच अंदाज बांधत असतो ??
पण हे अंदाज बांधणे किंवा एखाद्याविषयी आपले मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे ?
         बर्याचदा आपण  पहील्या भेटीतच समोरच्याच्या बोलण्यातुन किंवा एकंदरीत वागण्यातुन तो कसा आहे याचे स्पष्ट मत आपल्या मनावर बिंबऊन घेतो....हे खरचं कितपत योग्य आहे ..?
       पण जर योग्य असेल तर कशावरुन ..?
काय पुरावा आहे तुमच्याकडे कि तो तसा आहे..
तुम्ही तुमच्या मनानेच त्याच्याविषयीची मतं तुमच्या मनात बनऊन घेतले आहेत...
कदाचित समोरचा तसा नसेलही किंवा असही असेल कि तुमच्या मनात त्याच्याविषयी काहीतरी वेगळ मत निर्माण व्हावे म्हणुन तो तसा वागत असेल , कदाचित त्याच आत्ताच व्यक्तीमत्व आणि नंतरच व्यक्तिमत्व वेगवेगळी असु शकतात ..काहीही असु शकतं...!
पण आपण का आपल्या मनानेच त्याचा अंदाज बांधायचा...?
       पहिल्याच भेटीत समोरच्याचा चेहरा ,त्याचा स्वभाव कधिच सांगत नाही....
        असा चेहरा पाहून  त्याच्या मनातले किंवा त्याचा स्वभाव कळायला आपल्याला आधी त्याच मन बनाव लागेल..
         अहो ! इथे आपण एका भेटीतच समोरच्याच मन जाणुन घेण्याचा प्रयत्न करतो...
पण कधी कधी वर्षानुवर्ष एकमेकांच्या सहवासात राहून सुद्दा आपण एकमेकांना नीट ओळखतोच असे नाही..
     हा आता हेच पहा ना ...हे वाचल्यावर तुमच्याच डोक्यात काय-काय प्रश्न आले असतील .... " कि आपण कोनाबद्दल काय मत केल होत किंवा आपल्याबद्दल कोणी काय मत बनऊन घेतल होत.."आणि त्याच आता काय झालं...अशा प्रकारचे..
        बर्याचदा माझ्याबरोबर पण असचं झालेल आहे...समोरचा माझ्याविषयी कधी कधी त्याच्या मनात त्याच्या मनाला पटतील अशी निरनिराळी मते निर्माण करतो....तर कधी कधी मीच समोरच्याच्या मनात माझ्या विषयी काही वेगवेगळी मते निर्माण करतो...कारण नंतर मला त्याच्या मनाचा भ्रमनिरास पाहून हायसे वाटते...
         आता काहींच्या मनात मला भेटलेली पहीली भेट आठवली असेल तर नक्कीच त्यांच्या चेहर्यावर एक आडवी चंद्रकोर नक्की  ऊमलली असेल....
असाो...
तर हे असं आपण एकमेकांचे असे अंदाज बांधत बसलो कि शेवटी भ्रमनिरास आपलाच होतो...
      का एखाद्याविषयी आपल्या मनात वेगवेगळी मत निर्माण करायची...
खरच तो असा आहे की नाही याची कोणतीही शहानिशा न करता...
हो आणि एखाद्याविषयी मत निर्माण केल्यावर ती फक्त तुमच्याकडेच ठेवा..उगाच दुसर्यावर लादने हे चुकीचेच ..
कारण मतं ही तुम्हीच निर्माण केली आहेत आणि तुमच्या मतानुसार समोरच्याने वागणे हे कितपत योग्य आहे...??
 
    असो व्यक्ती तितक्या वृत्ती आणि क्षण- क्षणाचे सोबती.....
   हे क्षणही असेच निघुन जातील...

३ टिप्पण्या: